--- मेहेंदळे बाईसाहेब, हे नेहमीचेच आहे. ……नुसते खासदारांची नावेच नाहीत तर दूरदर्शन वरून महाराष्ट्रातील मतदार संघाची नावे सुद्धा चुकीची दाखवितात . आठवलेंच्या नावाचा उच्चार अठावले असा तर गवईनच्या नावाचा उच्चार गावई असा करतात. व यांच्या अनुनायांनी त्याला कधी हरकत घेतली असे आठवत नाही. दिल्लीश्वरांनी मराठी नावांची मोडतोड करावी याला खूप जुना इतिहास आहे. उदा. भोंसलेचे भोंसला व पेशवेचे पेशवा हे मोगलांनी केले व इंग्रजांनी त्यांची री ओढली. व अशा गोष्टींना हरकत न घेण्याचा इतिहासही तेवढाच जुना आहे. आळंदीचा उल्लेख अलांदी असा केला जातो.
सुप्रसिध्द लेखक अविनाश बिनीवाले यांनी या विषयावर एक लेखमालाच काही दिवसांपूर्वी लोकसत्तामधून लिहिली होती. त्यांच्या मते एखाद्याचा मानभंग करायचा असेल तर त्याच्या नावाची मोडतोड करा. मुंबईला कुणीतरी बंबई म्हटले ते आम्ही खपवून घेतले व पुढे ते आम्हाला वर्षोनुवर्षे छळत राहिले. अजुनही चालते आहे. व भय्या लोकांसोबत काही सुशिक्षित मराठी माणसेही अजुनही बंबई, पुना, थाना, बांद्रा (वांद्रे), सायन (शिंव), वरली म्हणतांना आढळतात. महाराष्ट्रात चव्हाण आहेत दिल्लीवाले त्यांना चौहान म्हणून बोलावतात व आमचे चव्हाण त्याला कधीच हरकत घेत नाहीत.
राष्ट्रपती असलेल्या प्रतिभाताइनचे माध्यामांमध्ये वापरण्याकरिता अधिकृत नाव जबाबदार सनदी अधिकाऱ्यांनी ठरविले असण्याची शक्यता आहे पण ते बरोबर होते का ? माध्यमांमधून त्यांचे नाव प्रतिभा (ताई नव्हे ) देवीसिंग पाटील असे सांगितले जायचे. देवीसिंग हे प्रतिभाताइनचे यजमान पण त्यांचे आडनाव शेखावत मग राष्ट्रपती प्रतिभा (ताई नव्हे ) देवीसिंग पाटील कसे ? पण पाच वर्षे तेच आम्ही ऐकत होतो.
यात आणखी एक गोम आहे. महाराष्ट्रात आदराने प्रतिभाताई, वसंतदादा (माजी मुख्य मंत्री ज्यांच्या गृहजिल्ह्यात आपण जिल्हाधिकारी होता. ) असे या नेत्यांना संबोधले जाते. पण हा आदरभाव दिल्लीच्या सरकारी माध्यमांना मंजूर नव्हता. त्यांनी कायम प्रतिभा, वसंतराव असाच उल्लेख केला. पण उत्तर प्रदेशातील कुख्यात नेता रघुराजसिंग याचा उल्लेख मात्र बातम्यांमधून रघुराजसिंग उर्फ राजाभैय्या असा प्रत्येक वेळेस केला जायचा व आजही केल्या जातो. म्हणूनच म्हटले आहे " उद्धवा अजब तुझे सरकार ". आता उद्धवाचे सरकार सत्तेवर आले आहे. पाहू काही फरक पडतो काय? पण ज्याने त्याने आपल्या, आपल्या गावाच्या नावाची मोडतोड होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा