गुरुवार, १७ डिसेंबर, २०१५

काल सकाळी झीन्यूज वर ही बातमी पाहिली व नंतर मात्र गडप झाली.
आजच्या प्रमुख वृत्तपत्रातूनही बातमी दिसली नाही.
एका स्थानिक वृत्तपत्रात मात्र प्रसिद्ध झाली आहे.
आपल्या सोबत वाटून घेत आहे.
बातमी अशी -------
गोमांस विक्रेत्या कंपन्यांकडून
भाजपला २.५ कोटींची देणगी
ॅ वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गोमांस सेवन आणि विक्रीवरून देशभरात उठलेलं वादळ आणि भाजप नेत्यांनी गोमांस विक्रीवर बंदीची केलेली मागणी यासारखे मुद्दे ताजे असतानाच भाजपनेच गोमांस विक्री करणार्‍या कंपन्यांकडून फंडिंग झाल्याचे समोर आले आहे. संबंधित कंपन्यांकडून भाजपला मिळालेल्या देणग्यांची यादी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
भाजपचे प्रवक्ते शहनवाझ हुसेन यांनी मात्र याबाबत कुठलीही माहिती नसल्याचे सांगितले आहे. याबाबत अधिक चौकशी केल्यानंतर खुलासा करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. 
मात्र गोमांस विक्रीवर आक्षेप घेणार्‍या भाजपला गोमांस विक्रेत्या कंपन्यांकडून देणगी घेण्यात कुठलाही आक्षेप नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर असलेल्या माहितीनुसार २0१३-१४ या वर्षात गोमांस आयात करणारी मुंबईतील कंपनी फ्रायगोरीफिको अल्लाना लिमिटेडने पक्षाला ७५ लाखांची देणगी दिली होती. १९८६ मध्ये या कंपनीची ज्या पत्त्यावर नोंदणी झाली आहे, त्याच पत्त्यावर नोंदणी झालेल्या फ्रायगेरियो कन्वेरवा अल्लाना लिमिटेडने भाजपला ५0 लाख तर इनडाग्रो फूड्स लिमिटेड कंपनीने ७५ लाखांची देणगी दिल्याची माहिती आहे.
चेकद्वारे कंपन्यांकडून भाजपला देणग्या मिळाल्या आहेत. या तिन्ही कंपन्या गोमांस व्यक्तिरिक्त इतरही काही वस्तू आयात करतात.
(लोकशाही वार्ता, अमरावती आवृत्ती दिनांक १८/१२/२०१५)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: