| तुम्हाला गरीब देशातील गरीब पंतप्रधानांच्या झोपडीत राहायचे आहे काय ? | " गुजरातमध्ये कच्छच्या
वाळवंटातील शेवटचे गाव धोरडोतील "टेंट सिटी'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्यासाठी बनवण्यात आलेल्या राजेशाही थाटातील अलिशान तंबूमध्ये तुम्हीही
थांबू शकता. यासाठी तुम्हाला थोडा खिसा रिकामा करावा लागेल. रणोत्सवात
पर्यटकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने पर्यटन विभागाने पंतप्रधानांचा
व्हीव्हीआयपी तंबू जशास तसा ठेवून तो भाड्याने देण्याचा निर्णय घेण्यात
आला. ५० व्या ऑल इंडिया डीजी कॉन्फरन्सवेळी पंतप्रधान मोदी या तंबूत थांबले
होते. धोरडोमधील टेंट सिटीतील या व्हिव्हिआयपी टेंटमध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा आहेत. साधरण ३१ लाख रुपयांच्या खर्चातून तयार केलेल्या या तंबूचे भाडेही लाखात असेल. यातील स्नानगृहातील फिटिंग्जही लाखो रुपयांची आहे. या व्हिव्हिआयपी तंबूच्या पहिल्या पाहुण्या गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल असतील. २४ डिसेंबर रोजी कच्छ रणोत्सवास औपचारिक सुरुवात होणार आहे. यानंतर २५ डिसेंबरपासून हा भव्य तंबू पर्यटकांसाठी खुला असेल. गुजरातचे पर्यटनमंत्री सौरभ पटेल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यासोबत येणाऱ्या सर्व व्हीव्हीआयपी पाहुण्यांसाठी ११ भव्य तंबू तयार करण्यात आले होते. आता ते रणोत्सवात येणाऱ्या पर्यटकांसाठी भाड्याने दिले जातील. हे तंबू गुजरात सरकारचे आहेत. त्यामुळे त्याचा नव्याने करार करण्यात आला आहे. या तंबूूसाठी किती भाडे निश्चित करायचे यावर उच्च स्तरावर चर्चा सुरू असून लवकरच ते निश्चित केले जाईल. "(दिव्यमराठी) | |
मंगळवार, २२ डिसेंबर, २०१५
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा